Posts

Showing posts from October, 2018

हम्पटा पास ट्रेक : अविस्मरणीय छत्रूतून सुटका

Image
          शुक्रवार  २८/०९/२०१८  छत्रू  आजची सकाळ खूप स्पेशल होती.पहाटे ५:३० वाजता जाग आली.तसे सगळे लवकरच उठले म्हणा.सर्वजण सॅकमध्ये  आपले सामान भरून तयार झाले.त्या रूमची स्वच्छता केली.YHAचे  Field Director चव्हाण सर २०-२५ की.मी चा ट्रेक करून ग्राम्फू/कोक्सर वरून रात्री छत्रूला आले होते.त्यांनी जातीने सगळ्या ट्रेकर्सची चौकशी केली.चहा घेतला आणि  चॉपरचा आवाज आला आणि निघून गेले.नंतर ८ वाजता बरोबर चॉपर आले.प्रचंड मोठा आवाज होता पात्यांचा,हवेचा वेगही  खूप होता.चॉपरमध्ये जाण्यासाठी शिडी लावली. २५ ते ३० जण बसतील इतक मोठ होत चॉपर.सगळे चढले आणि चॉपरने भरारी घेतली आकाशात. सुरवातीला  सगळीकडे बर्फच बर्फ दिसत होता.मग उंच डोंगरावरचा सपाट भाग दिसला. साधारण २०-२५ मिनिटांचा हवाई प्रवास करून कुल्लूला पोहीचलो               कुल्लुला चॉपर मधून उतरताच न्यूज चॅनलवाले,फोटोग्राफरयांनी सगळ्यांचे फोटो काढले शूटिंग करत होते.लगेच  अॅम्बुलंस मध्ये बसलो.कुल्लू हॉस्पिटल मध्ये चेकअप झाला.न्यूजवाल...

हम्पटा पास ट्रेक :मुक्काम पोस्ट छत्रू (भाग २ )

Image
 सोमवार २४/०९/२०१८ दुसरा दिवस छत्रू            काल रात्री  शांत झोप लागली.शनिवारी ट्रेक करून दमलो होतो,रविवारी बर्फाचा विचार करून थकलो होतो आणि आज  अशी माहिती होती की बर्फ थांबणार नाही  पुढील काही दिवस.चहा आला ७:०० वाजता. चहा घेतल्यावर पत्ते खेळायला घेतले ७:३० वाजता आणि   BLUFF चा डाव जेवणापर्यंत चालू होता.टेलीफोनला रेंज नाही,लाईट नाही मनात विचार आला कुठे फसलो आपण ?कधी सुटका होईल ?देव जाणे?             सकाळी १० वाजता जेवण केल.दुपारी १२ वाजता आमच्या नंतरचा ग्रूप HPR 10 कठीण परिस्थितीत ट्रेक करून आज  छत्रूला आमच्या सोबत राहायला आला.आता रूम मध्ये एकूण ४२ जण राहणार होते.त्यांनी कसा ट्रेक केला सियागोरू ते छत्रू  याची माहिती दिली.दुपारी ४ वाजता चहा आला.चहा घेतल्यावर परत पत्ते चालू.    दुपारी फोन लागला कुल्लू बेस कॅम्पला आणि ग्रूप  लीडरने माहिती दिली की दोन्ही ग्रूप इथे सुखरूप आहे.संध्याकाळी ५:३० वाजता  रात्रीच जेवण केल.रात्री लवकरच झोपी गेलो.आपल्याकडे जस संततधार...

हम्पटा पास ट्रेक:मुक्काम पोस्ट छत्रू (भाग १ )

Image
            रात्रभर जोरदार बर्फवृष्टी चालू होती.रात्री १ ते २ च्या सुमारास एक तंबू कोसळला.सुदैवाने त्यात कुणी नव्हते.सकाळी उठलो तेव्हा आजूबाजूला १ ते २ फुटापर्यंत बर्फ साठला होता.तंबूच्या बाहेर आलो तेव्हा बर्फ पडत होता आणि  आजूबाजूच्या डोंगरावर Avalanche होताना दिसत होते व जोराचा आवाज येत होता.मी  आयुष्यात पहिल्यांदाच हे सर्व बघत होतो.           आमच्या तंबूत आता सगळे उठले होते.आतमध्ये  काही भाग ओला झाला होता.तंबूच्या  समोर आणि साईडला बर्फ साठला होता.पाणी नसल्यामुळे चहा  आला नाही.सकाळपासून गाईड कुठेतरी गेले होते ते आल्या वर  सर्वानी नाश्ता (मॅगी) केला.त्यांनी सांगितले आता इथे राहणे धोकादायक  आहे तेव्हा पुढे ३ कि.मी अंतरावर Farm House आहे तिथे आपली राहण्याची व जेवणाची सोय होऊ शकते.              सगळ्यांनी  Sleeping bag बरोबर घेतल्या आणि निघालो गाईडच्या मागे.परिस्थिती भयाण होती.रस्ता पूर्ण बर्फाने वेढला होता. बर्फ वृष्टी चालूच होती.एक कि.मी गेल्यावर एक संदर...

हम्पटा पास ट्रेक :दिवस पाचवा (सियागोरू ते छत्रू)

Image
        काल रात्री प्रचंड थंडी होती.आज सकाळी लवकर जाग आली.सगळ्यांनी चहा, नाश्ता केला.दुपारसाठी जेवण घेतले व ८:०० वा सगळे तयार झाले आणि  बर्फ पडण्यास सुरुवात झाली.त्यावेळेस आम्ही राष्ट्रगीत सर्वानी एकत्र म्हटले.खूप excited होते सगळे कारण आज ट्रेकचा शेवटचा दिवस  होता.         सियागोरू  ते छत्रू (१११००ft) ९ कि.मी सरळ उतार होता.छत्रूला दुपारी ३ च्या आत पोहचून  बसने  चंद्रताल तलाव बघायचा व परत छत्रूला रात्री मुक्काम करायचा. असा प्लान होता.         राष्ट्रगीत झाल्यावर सॅक खांद्यावर घेतली आणि निघालो.क्रिस्टलसारखा पांढरा शुभ्र  बर्फ पडत होता.मन आनंदी  होते कारण मी  Unexpectedly Snowtrek करत होतो.पण जशी चढाई सुरु केली तसा बर्फ वृष्टी चांगलीच  वाढली.कुठे थांबताही येईना.         सगळीकडे बर्फ दिसत होता.पुढच्याच्या मागे काळजीपूर्वक चालत होतो.दोन तिन वेळा पाय घसरला आणि पडलो.लागल नाही काही.माती आणि बर्फ एकत्र होवून काही ठिकाणी चिकलात पाय घसरत होते.पायाच्या घोट्या प...

हम्पटा पास ट्रेक:दिवस चौथा (बालू का घेरा ते हम्पटा ते सियागोरू)

Image
        आजचा  ट्रेक बालू  का घेरा(१२४११ ft) ते सियागोरू(१२२५४ ft) मार्गे हम्पटा पास १४१०० ft असा होता.१२ ते १३ की.मी ची चढाई होती.       हम्पटा पास ट्रेकचा सर्वात अवघड भाग आज सर्व ट्रेकर्स पूर्ण करतील असा  विश्वास गाईडने दिला.सकाळी  सगळे लवकर आवरून ८:०० वा  तयार झाले पुढील चढाईसाठी.ही कॅम्प साईट दोन्ही डोंगराच्या मध्यभागी अतिशय सुंदर जागी  होती.गवत काही ठिकाणी हिरवगार तर काही ठिकाणी  तांबुस रंगाचे छान दिसत होत.दगड,माती असलेले डोंगरावरून चालत होतो.प्रत्येक पाऊल  हळूच जपून टाकत होतो.                   सूर्य चांगलाच तळपत होता.ऑक्सिजन पातळी कमी होती.उंचीचा(High Altitude) त्रास होऊ नये  म्हणून छोटे ब्रेक घेत होतो.काही ठिकाणी चढ दमछाक आणणारा होता.कुणी कुणाशी काही बोलत नव्हते कारण  बोलतानाही धाप लागत होती.          दुपारी जेवणासाठी  थांबलो कालसारखेच छोटी नदी ओलांडल्यावर.भूक अजिबात नव्हती पण केल जेवण.थोडा आराम केल्यावर लगेच ...

हम्पटा पास ट्रेक :दिवस तिसरा ( चिक्का ते बालू का घेरा)

Image
           चिक्काची कॅम्प साईट उतारावर असल्यामुळे अस वाटल कि झोपेत मी समोरच्याकडे जातो की काय.पण तसे काही झाले नाही.रात्री झोपताना असा विचार आला की हाकेच्या अंतरावर इथे  मोठा धबधबा, तंबूच्या इकडच्या बाजूला छोटीशी नदी, दोन्ही ठिकाणचे  पाण्याचे आवाज  रात्री स्पष्ट जाणवत होते.अशा ठिकाणी निसर्गाच्या कुशीत आपल्यला झोपायला मिळणे  ही  भाग्याची गोष्ट!!!                       प्रत्येक कॅम्प साईट वर कुठूनतरी लांबून  झरण्यातून प्लास्टिक पाईपने पाणी यायचं तेच पाणी स्वयपाकासाठी,पिण्यासाठी,स्वच्छतेसाठी वापरायच.पाणी खूप थंड असत.             हिमालयात स्वच्छता खूप महत्वाची आहे.इथे कॅम्प साईटवर खोल खड्ड करून त्यावर संडासच भांड बसवल जाते व चैन असलेला छोटा तंबू असतो.कुठेही उघड्यावर जायला बंदी आहे.महाराष्ट्रात सहयाद्रीतल्या गड किल्ल्यांमध्ये अस काही करायला हव.शिवाय कचरा कुठेही टाकता येत  नाही.            पहाटे ४:०० वा...

हम्पटा पास ट्रेक :दिवस दुसरा (सेठान ते चिक्का)

Image
सेठानला काल आल्यापासून रात्रीचे जेवण ,सकाळचा चहा,नाष्टा सर्व काही रोडवर आम्ही घेत होतो.कालपासून रोडवर फक्त  ५-६ गाड्या दिसल्या.रात्री कॅम्प फायर २ तास चालू होते.ग्रुप मध्ये कुणाचा कितवा ट्रेक आहे,आवड कशी लागली,कोण काय  काम करतो याची चर्चा रात्री १० पर्यंत चालू होती.नंतर Sleeping Bag मध्ये झोप कधी लागली समजलच  नाही.    सकाळी ८:१५ वा  राष्ट्रगीत झाले .कॅम्प लीडर,किचन स्टाफसाठी हिप हिप हुर्रे केलं आणि ट्रेक सुरु केला. आजचा ट्रेक सेठान (९१८४ ft) ते चिक्का (१०८२४ ft) अंतर  ८ कि.मी  आहे. पहिले ३ कि.मी चा पक्का  रस्ता होता.सोबत फक्त कुत्रा होता.निरव शांतता सकाळच्या वेळी आज अनुभवत होतो.हवा,नदीच्या पाण्याचा आवाज ऐकत रमत गमत सगळे चालत होते. वाटेत धरण दिसले.तिथेच Hydroelectric Power Station होते.हे शेवटचे सिमेंट बांधकाम. थोड पुढे गेल्यावर एक हॉटेल लागलं.तिथे काहींनी चहा घेतला.तिथे आम्ही २५ जण सोडून इतर  काही लोक दिसली.     मालवाहतूक करणाऱ्या गाडीमध्ये १० दिवसाचे बकरीचे पिल्ल होती  त्याच्याबरोबर काहींनी फ...

हम्पटा पास ट्रेक:दिवस पहिला

Image
    आज बुधवार प्रत्यक्ष ट्रेकला  सुरुवात झाली.सकाळी उठून चहा,नाष्टा झाला.सोबत Pack lunch घेतले.                साधारण ८:०० वाजता सर्वांची Counting होवून,Field Director यांनी झेंडा दाखवून,कॅम्प लीडर,किचन स्टाफ, ट्रेक लीडर यांनी  सर्व ट्रेकर्सला  शुभेच्छा दिल्या.आधीचे व नंतरचे ट्रेकर्स लाईन मध्ये उभे राहून चीअर करत होते.शिवाजी महाराजांचे मावळे एखाद्या मोहिमेला निघताना जसे वातावरण असेल कदाचित तसेच वातावरण मी अनुभवत होतो (काही वेळासाठी)                 १५ कि मी प्रवास बसने मनाली मार्गे पुढे प्रिणी गावा पर्यंत केला.ट्रेक लीडर मोनू आणि पन्ना भाई आमच्यासोबत  आले.बेसिक टिप्स त्यांनी सांगितल्या -कितना बाकी है?अस कुणीही विचारायचं नाही -सगळे आता Family सारखे आहेत.कृपया एकमेकांना सांगा काहीही प्रोब्लेम वाटला तर(Altitude Sickness) -अतिशय महत्वाचे ५० % मेंदुचा रोल ट्रेक पूर्ण करण्यात तेव्हा Concentrate on single STEP.     आजचा ट्रेक ८ कि मी आहे.मनाली हे शहर समुद्र सपा...