हम्पटा पास ट्रेक:दिवस चौथा (बालू का घेरा ते हम्पटा ते सियागोरू)

        आजचा  ट्रेक बालू  का घेरा(१२४११ ft) ते सियागोरू(१२२५४ ft) मार्गे हम्पटा पास १४१०० ft असा होता.१२ ते १३ की.मी ची चढाई होती.
      हम्पटा पास ट्रेकचा सर्वात अवघड भाग आज सर्व ट्रेकर्स पूर्ण करतील असा  विश्वास गाईडने दिला.सकाळी  सगळे लवकर आवरून ८:०० वा  तयार झाले पुढील चढाईसाठी.ही कॅम्प साईट दोन्ही डोंगराच्या मध्यभागी अतिशय सुंदर जागी  होती.गवत काही ठिकाणी हिरवगार तर काही ठिकाणी  तांबुस रंगाचे छान दिसत होत.दगड,माती असलेले डोंगरावरून चालत होतो.प्रत्येक पाऊल  हळूच जपून टाकत होतो.

       
          सूर्य चांगलाच तळपत होता.ऑक्सिजन पातळी कमी होती.उंचीचा(High Altitude) त्रास होऊ नये  म्हणून
छोटे ब्रेक घेत होतो.काही ठिकाणी चढ दमछाक आणणारा होता.कुणी कुणाशी काही बोलत नव्हते कारण  बोलतानाही धाप लागत होती.
         दुपारी जेवणासाठी  थांबलो कालसारखेच छोटी नदी ओलांडल्यावर.भूक अजिबात नव्हती पण केल जेवण.थोडा आराम केल्यावर लगेच निघालो. गाईडने सांगितले अजून तास दीड तास लागेल हम्पटा पासला पोहचायला.आता थोड अस्वस्थ वाटल शरीरात थकवा जाणवत होता,डोक गरगरत होत.मनात एक विचार असाही आला कुणी सांगितल होत इथ यायला?
          मजल दरमजल करत शेवटी पोहोचलो १४१०० ft वर.समोर देवतिब्बा १९६८७ ft व इंद्रसेन पर्वत २०४१०  ft दिसत होते.दोन्ही पर्वत बर्फाने वेढलेले होते दोन्ही सर्वात उंच पर्वत आहेत पीर पंजाल पर्वत रांगामध्ये.अस मानतात की या ठिकाणी पूर्वी देवांचा देव इंद्रदेव (Lord of war and weather) इंद्रसेन पर्वतावर बसत.काही पर्वतावर असलेला बर्फ वर्षानुवर्षे वितळत नाही त्याला  ग्लेशियर म्हणतात.
देव तिब्बा ट्रेक आहे अस समजल.


 




       अर्धा तास आम्ही सगळे तिथे थांबलो.फोटो काढले.उतरायला सरुवात केली.दोन तासांची उतरण प्रचंड अवघड होती.पाय घसरला तर पडायची भीती तेव्हा आडवे पाय टाकून हळूहळू उतरत होतो.एकदा तर वरून हातात मावेल इतक्या आकाराचा दगड वेगाने खाली आला सुदैवाने कुणला लागला नाही.
   

     हम्पटा पास,सारपास  पास म्हणजे पूर्वीच्या काळी रस्ते नव्हते तेव्हा मेंढपाळ व गावकरी जो जवळचा मार्ग मनालीला जाण्यास  वापरायचे.हम्पटा पास हा कुल्लू व लाहोल ,स्पिती Valley जोडतो




इतर कॅम्प साईट सारखीच सियागोरूची कॅम्पची जागा  अतिशय सुंदर होती.आज ट्रेक पूर्ण झाल्यातच जमा होतो म्हणून रात्री जेवणात गुलाबजाम दिले.इतक्या उंचीवर किचन स्टाफ सर्व ट्रेकर्सची काळजी घेतो.त्यांना मनाचा मुजरा.

   जेवना नंतर गुज्जू ट्रेकर्सने गरबा शिकवला व कुर्गी डान्स शिकवला कर्नाटक मधील ट्रेकर्सनी.ट्रेक पूर्ण
झाल्याचा आनंद सगळ्यांनी   मस्त ENJOY केला.
 



  सर्व ट्रेक रूट,वेगवेगळे TERRAIN,नदी,धबधबा,उंच झाड,माती व दगड यांचा वाळवंट,प्रखर सूर्यप्रकाश,  प्रचंड थंडी,पाऊस  सर्व  खूप खास होत पण SNOWFALL बाकी होता.उद्या थोडा बर्फ पडला तर बर होईल आणि ट्रेक संपूर्ण होईल असा विचार करून झोपी गेलो.क्रमश  

Comments