हम्पटा पास ट्रेक :दिवस पाचवा (सियागोरू ते छत्रू)


        काल रात्री प्रचंड थंडी होती.आज सकाळी लवकर जाग आली.सगळ्यांनी चहा, नाश्ता केला.दुपारसाठी जेवण घेतले व ८:०० वा सगळे तयार झाले आणि  बर्फ पडण्यास सुरुवात झाली.त्यावेळेस आम्ही राष्ट्रगीत सर्वानी एकत्र म्हटले.खूप excited होते सगळे कारण आज ट्रेकचा शेवटचा दिवस  होता. 
       सियागोरू  ते छत्रू (१११००ft) ९ कि.मी सरळ उतार होता.छत्रूला दुपारी ३ च्या आत पोहचून  बसने  चंद्रताल तलाव बघायचा व परत छत्रूला रात्री मुक्काम करायचा. असा प्लान होता.
        राष्ट्रगीत झाल्यावर सॅक खांद्यावर घेतली आणि निघालो.क्रिस्टलसारखा पांढरा शुभ्र  बर्फ पडत होता.मन आनंदी  होते कारण मी  Unexpectedly Snowtrek करत होतो.पण जशी चढाई सुरु केली तसा बर्फ वृष्टी चांगलीच  वाढली.कुठे थांबताही येईना.
        सगळीकडे बर्फ दिसत होता.पुढच्याच्या मागे काळजीपूर्वक चालत होतो.दोन तिन वेळा पाय घसरला आणि पडलो.लागल नाही काही.माती आणि बर्फ एकत्र होवून काही ठिकाणी चिकलात पाय घसरत होते.पायाच्या घोट्या पर्यंत बर्फ जमा झाला सगळीकडे.गाईडच्या  मागे सगळे चालले होते. दम लागल्यावर उभ रहायचं थोडावेळ कारण  बसायला शक्य नव्हत.
      जेवणाची वेळ निघून गेली.चालत होतो, चालत होतो.आणि गाईडने  सांगितले अजून एक तास चालाव लागेल  मग छत्रूला पोहोचू.रोज दुपारी  ३:00 पर्यंत कॅम्पवर जाणारे आम्ही  आज ४:०० वाजता पोहोचलो.सलग ८ तास चालत होते सगळे.फोटो कुणी जास्त काढले नाही.
     बर्फ वृष्टी वेगात सुरु होती.छत्रूचा किचन  स्टाफ तंबूवरचा बर्फ सकाळपासून काढत होता.आम्ही तंबू मध्ये आलो   डब्बा काढला जेवण केले. नंतर चहा घेतला,बर वाटलं,कुणी कुणाशी काही बोलत नव्हते,सगळे शांत.


 

 ''भाई साब टेंट हिलावो  नहितो गीर जायेगा" अस एकाने सांगितल.आणि दर एक तासांनी दोघे बाहेर जाणार तंबू काठीने हलवणार साठलेला बर्फ काढणार आणि आतले पायाने मारणार.अस रात्रभर चालू होत.आज  संध्याकाळी जेवायला फक्त वरण भात होता.जेवण केल आणि गणपतीला प्रार्थना केली की बर्फ थांबव आता.
     पण नियतीच्या मनात वेगळच  काही होत.  क्रमश  

Comments