हम्पटा पास ट्रेक :दिवस तिसरा ( चिक्का ते बालू का घेरा)

           चिक्काची कॅम्प साईट उतारावर असल्यामुळे अस वाटल कि झोपेत मी समोरच्याकडे जातो की काय.पण तसे काही झाले नाही.रात्री झोपताना असा विचार आला की हाकेच्या अंतरावर इथे  मोठा धबधबा, तंबूच्या इकडच्या बाजूला छोटीशी नदी, दोन्ही ठिकाणचे  पाण्याचे आवाज  रात्री स्पष्ट जाणवत होते.अशा ठिकाणी निसर्गाच्या कुशीत आपल्यला झोपायला मिळणे  ही  भाग्याची गोष्ट!!!
       
              प्रत्येक कॅम्प साईट वर कुठूनतरी लांबून  झरण्यातून प्लास्टिक पाईपने पाणी यायचं तेच पाणी स्वयपाकासाठी,पिण्यासाठी,स्वच्छतेसाठी वापरायच.पाणी खूप थंड असत.
            हिमालयात स्वच्छता खूप महत्वाची आहे.इथे कॅम्प साईटवर खोल खड्ड करून त्यावर संडासच भांड बसवल जाते व चैन असलेला छोटा तंबू असतो.कुठेही उघड्यावर जायला बंदी आहे.महाराष्ट्रात सहयाद्रीतल्या गड किल्ल्यांमध्ये अस काही करायला हव.शिवाय कचरा कुठेही टाकता येत  नाही.
           पहाटे ४:०० वा  जाग आली,पडून राहिलो तसाच इथे लवकर उठून काय करणार ?कालचा ट्रेक सोपा होता.ग्रुप मध्ये  सगळ्यांचा फिटनेस चांगला होता.सकाळी चहा,नाष्टा करून,दुपारच जेवण सोबत घेतल आणि ८:०० वा निघाले  सगळे पुढील चढाईसाठी.
       आजचा ट्रेक चिक्का १०८२४ft  ते बालु घेरा  ११८०८ft  १०-१२ की.मी होता.बऱ्यापैकी चढाई  आणि नदी ओलांडायची होती. 
           आतापर्यंत आपल्यला  कितीतरी वर्ष जुने देवधार ,चीनार ,ओंक ची झाडे लागली, हिरवाईने नटलेला परिसरातून भटकंती चालू होती हा सगळा कुल्लू  Valley (घाटी)भाग जो आता संपणार आणि  पुढे लाहौल स्पिती Valley चा भाग  सुरु होणार.११००० ft उंची वर झाड उगत नाही त्यामुळे ऑक्सिजन पातळी कमी होणार.
            उघडे बोडके डोंगर,मोकळे खडक मातीचे वाळवंट लागले. वर निळ्या रंगाचे आकाश,प्रखर सूर्यप्रकाश,नदीचा आवाज या सोबत चालत होतो.मधेच ६-८ केचर पाठीवर प्रचंड ओझे घेवून जाताना दिसले. .दगड, माती, पाणी  असलेल्या वाटेतून तोल सांभाळून  बऱ्यापैकी वेगात  जायचं किती अवगड.
           
  River Crossing आल्यावर सगळ्यांनी बूट काढली एकमेकांचा हात धरून साखळी करून जपून जायचं होत.नदीतल्या पाण्याला वेग प्रचंड होता.जेव्हा पाय पाण्यात टाकले तेव्हा जाणवल  पाणी खूप खूप  थंड आहे .नदी ओलांडल्यावर  अस वाटल की आपल्याला दोन्ही पाय नाहीत,सुन्न झाले होते पाय काही वेळासाठी.
             आज दुपारी जेवणासाठी थांबलो ते हिरव कुरण होते.कालपर्यंत होटेलवर दुपारच जेवण होत असे पण मोकळ्या आकाशाखाली हिरव्यागार गवतावर बसून जेवण केले.थोडावेळ तिथेच  आराम केला.
       
            जेवणानंतर चालायला सुरु केल एक डोंगर पार केल की दुसर डोंगर.सगळीकडे हिरवे गवत व दगड मातीचे डोंगर.समोर दूर अंतरावर बर्फाने वेढलेला डोंगर दिसत होता.दौलाधार पर्वत रांग सुंदर दिसत होती आणि याच ठिकाणी दोन्हीकडे डोंगर व मध्यभागी  बालू का घेराची(Balu-Sand) कॅम्प साईट होती.
       
 



 कॅम्पवर दुपारी पोहोचलो तेव्हा ३:३०  वाजले होते.इथे आल्यावर Welcome drink ,चहा घ्यायचा व पुढे १ तास आजूबाजूला फिरून यायच, फोटो काढायचे किवा गप्पा मारायच्या.झोपण्यास बंदी कारण उंचीवरचा नियम.शरीरातल पाणी कमी होवू द्यायचं नाही.
           संध्याकाळी थोडावेळ १५ ते २० मिनिट हलकासा पाऊस झाला.पहाडी भागातला हवामान बेभरवशी
 असत अस ऐकल होत आणि ते खर आहे  कारण दुपारी कडक उन होत.रात्री आकाश निरीक्षण केल जेवनानंतर.मग गाण्याच्या भेंड्या एक तास चालल्या.रात्री तंबूमध्ये आम्ही तिघेच होतो मी,कॅम्प लीडर व पंकज.गप्पा मारताना जाणवलं की उंदीरमामा आमच्या तंबूमध्ये मस्त फिरत होते  मग समान आवरल तंबूच्या बाजूने दगड लावले मग झोप लागली.क्रमश

Comments