हम्पटा पास ट्रेक : अविस्मरणीय छत्रूतून सुटका

   
     शुक्रवार  २८/०९/२०१८  छत्रू 
आजची सकाळ खूप स्पेशल होती.पहाटे ५:३० वाजता जाग आली.तसे सगळे लवकरच उठले म्हणा.सर्वजण सॅकमध्ये  आपले सामान भरून तयार झाले.त्या रूमची स्वच्छता केली.YHAचे  Field Director चव्हाण सर २०-२५ की.मी चा ट्रेक करून ग्राम्फू/कोक्सर वरून रात्री छत्रूला आले होते.त्यांनी जातीने सगळ्या ट्रेकर्सची चौकशी केली.चहा घेतला आणि  चॉपरचा आवाज आला आणि निघून गेले.नंतर ८ वाजता बरोबर चॉपर आले.प्रचंड मोठा आवाज होता पात्यांचा,हवेचा वेगही  खूप होता.चॉपरमध्ये जाण्यासाठी शिडी लावली.
२५ ते ३० जण बसतील इतक मोठ होत चॉपर.सगळे चढले आणि चॉपरने भरारी घेतली आकाशात. सुरवातीला  सगळीकडे बर्फच बर्फ दिसत होता.मग उंच डोंगरावरचा सपाट भाग दिसला. साधारण २०-२५ मिनिटांचा हवाई प्रवास करून कुल्लूला पोहीचलो
 

            कुल्लुला चॉपर मधून उतरताच न्यूज चॅनलवाले,फोटोग्राफरयांनी सगळ्यांचे फोटो काढले शूटिंग करत होते.लगेच  अॅम्बुलंस मध्ये बसलो.कुल्लू हॉस्पिटल मध्ये चेकअप झाला.न्यूजवाल्यांनी माझी,गुजराती कपल व आणखी एकाची मुलाखत घेतली.तेव्हा समजल की भारतीय वायु दल ने  Operation White Mountain  मोहीम हाती घेतली आहे.चंद्रताल लेक ,रोहतांग पास,हमटा पास इथे अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी.आता मला आपण अडकलो त्याच गांभीर्य लक्षात आल.वर जेव्हा बर्फवृष्टी  चालू होती तेव्हा मुसळधार पाऊस कल्लू मनाली या भागात झाला होता.नुकसान काही ठिकाणी झाल होत.Land Slide  झाल्या होत्या.
         हॉस्पिटलमध्ये आल्यावर पाहिलं काम केल फोन गेले काही दिवस FLIGHT MODE वर होता तो काढला .आणि घरी फोन केला.तिथून गाडीत सगळे बसले आणि १५ मिल बेस कॅम्प कडे निघाले.वाटेत खूप ट्रफिक होती.ज्या पत्लीकुलला  आम्ही पहिल्या दिवशी शॉपिंगला आलो होतो तिथला पूल तुटला होता.गाडीवाल्याने आम्हाला पुलाच्या अलीकडे सोडल.मग आम्ही सगळे चालत निघालो बेस कॅम्पकडे.
        दुपारी १२:३०  वाजता बेस कॅम्पला पोहोचलो.आल्या आल्या गरम कॉफी घेतली,टेंट मध्ये सामान ठेवल आणि एकदम Relax झालो.आमच्या बरोबर पाठीमागे  राहिलेले ट्रेकर्स त्यांना यायला दुपारचे ३ वाजले होते.तोपर्यंत सगळ आवरल.गेले १०-१२ दिवस  शरीराला पाणी लागल नव्हत,थंड पाण्यात अंघोळ केली,सर्व थकवा दूर झाला.साधारण  ४ च्या  दरम्यान जोराचा पाऊस चालू झाला कुल्लुला.आता इथे थांबण्यात काही अर्थ नव्हता.मिळेल त्या गाडीने दिल्ली गाठायची आणि घरी जायचं.


         सगळ्यांना आता घरी जाण्यचे वेध लागले होते.HPR 09 चे सर्व ट्रेकर्स एक फॅमिली  झाली होती.गळाभेट घेवून सगळे निघत होते जड अंतकरणाने,पाऊस आता थांबला होता.मी,पंकज,हितेश आणि अनिश एकत्र निघालो ६ वाजता.रात्री कुल्लुला हॉटेलमध्ये जेवण केल.आणि १० वाजेच्या बस ने दिल्लीला गेलो.

        
            माझ्या आयुष्यातला पहिला हिमालयातला ट्रेक अविस्मरणीय झाला.मी मुद्दामहून एकट्याने अनोळखी लोकांसोबत ट्रेक बुक केला होता.खूप चांगले वेगवेगळ्या ठिकाणचे नवे मित्र मिळाले, त्यांच्याकडून खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या .१२ दिवस मस्त  एन्जॉय केल.आयुष्य भराच्या आठवणी सोबत घेवून गेलो घरी.  समाप्त... 
  "It's not the MOUNTAIN we conquer,but OURSELVES"  
                                                                                     Sir Edmund Hillary 

Comments