हम्पटा पास ट्रेक :दिवस दुसरा (सेठान ते चिक्का)




सेठानला काल आल्यापासून रात्रीचे जेवण ,सकाळचा चहा,नाष्टा सर्व काही रोडवर आम्ही घेत होतो.कालपासून रोडवर फक्त  ५-६ गाड्या दिसल्या.रात्री कॅम्प फायर २ तास चालू होते.ग्रुप मध्ये कुणाचा कितवा ट्रेक आहे,आवड कशी लागली,कोण काय  काम करतो याची चर्चा रात्री १० पर्यंत चालू होती.नंतर Sleeping Bag मध्ये झोप कधी लागली समजलच  नाही.
   सकाळी ८:१५ वा  राष्ट्रगीत झाले .कॅम्प लीडर,किचन स्टाफसाठी हिप हिप हुर्रे केलं आणि ट्रेक सुरु केला.
आजचा ट्रेक सेठान (९१८४ ft) ते चिक्का (१०८२४ ft) अंतर  ८ कि.मी  आहे.
पहिले ३ कि.मी चा पक्का  रस्ता होता.सोबत फक्त कुत्रा होता.निरव शांतता सकाळच्या वेळी आज अनुभवत होतो.हवा,नदीच्या पाण्याचा आवाज ऐकत रमत गमत सगळे चालत होते.
वाटेत धरण दिसले.तिथेच Hydroelectric Power Station होते.हे शेवटचे सिमेंट बांधकाम.
थोड पुढे गेल्यावर एक हॉटेल लागलं.तिथे काहींनी चहा घेतला.तिथे आम्ही २५ जण सोडून इतर  काही लोक दिसली.
  
 मालवाहतूक करणाऱ्या गाडीमध्ये १० दिवसाचे बकरीचे पिल्ल होती  त्याच्याबरोबर काहींनी फोटो काढले.
प्रिणी या गावातून येणारा रस्ता इथे संपतो.काही ट्रेकर्स इथपर्यंत गाडीने येतात व ट्रेक चालू करतात.
 इथून पुढे सगळीकडे  दाट  व उंच देवधारची झाड,ओंकची झाड, आवाज करत वाहणारी नदी,हिरवेगार डोंगर अशा प्रसन्न वातावरणात आम्ही चालत होतो.वाटेत  एक छानसा लाकडी पूल लागला.
मोहब्बते  या हिंदी सिनेमात  जे  नारंगी रंगाचे पान उडताना दिसते  ते Maple tree (चिनार)चे झाड दिसले.
          आजच्या दुपारच्या जेवणाचे ठिकाण खास होत.या वातावरणात भूक अशी लागत नाही पण खाव लागत.पाणी भरपूर  पिणे गरजेचे असते.नाहीतर Altitude Sickness चा त्रास चालू होतो.पिण्यासाठी पाणी वाटेत वाहणाऱ्या छोट्या झरन्यातून गाईडला विचारून  घ्यायच.

लाकडी पुलावरुन  एक नदी ओलांडली.दुपारी २:३० ते ३:००  वा चिक्का या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो.ही कॅम्प साईट उतारावर होती.तिथे गेल्यावर कॅम्प लीडरने  सांगितल इथे अंधार लवकर पडतो,थंडी खूप असते तेव्हा संध्याकाळी ६:३० वा  रात्रीचे  जेवण मिळेल.मधल्या वेळेत तिथे दुधसागर सारखा धबधबा होता.तिथे सर्वानी मस्त फोटो काढले. 
आमच्या ग्रूपमध्ये एकाजनाची आवड  Star Gazing होती त्याने मला  रात्री Milky way,Satellite दाखवले.Shooting Star मी काल पाहीला होता.रात्री ९:०० वा झोपी गेलो.पारा मध्यरात्री ४ ते ५ पर्यंत खाली गेला .क्रमश

Comments