हम्पटा पास ट्रेक:मुक्काम पोस्ट छत्रू (भाग १ )


            रात्रभर जोरदार बर्फवृष्टी चालू होती.रात्री १ ते २ च्या सुमारास एक तंबू कोसळला.सुदैवाने त्यात कुणी नव्हते.सकाळी उठलो तेव्हा आजूबाजूला १ ते २ फुटापर्यंत बर्फ साठला होता.तंबूच्या बाहेर आलो तेव्हा बर्फ पडत होता आणि  आजूबाजूच्या डोंगरावर Avalanche होताना दिसत होते व जोराचा आवाज येत होता.मी  आयुष्यात पहिल्यांदाच हे सर्व बघत होतो.
          आमच्या तंबूत आता सगळे उठले होते.आतमध्ये  काही भाग ओला झाला होता.तंबूच्या  समोर आणि साईडला बर्फ साठला होता.पाणी नसल्यामुळे चहा  आला नाही.सकाळपासून गाईड कुठेतरी गेले होते ते आल्या वर  सर्वानी नाश्ता (मॅगी) केला.त्यांनी सांगितले आता इथे राहणे धोकादायक  आहे तेव्हा पुढे ३ कि.मी अंतरावर Farm House आहे तिथे आपली राहण्याची व जेवणाची सोय होऊ शकते. 
            सगळ्यांनी  Sleeping bag बरोबर घेतल्या आणि निघालो गाईडच्या मागे.परिस्थिती भयाण होती.रस्ता पूर्ण बर्फाने वेढला होता. बर्फ वृष्टी चालूच होती.एक कि.मी गेल्यावर एक संदर पूल लागला.पुलावरून आम्ही चालत होतो,सिनेमात दिसतो  तसा पूल दिसत होता.प्रत्येक पिल्लर वर बर्फ होता.सगळे चालून एक पायवाट तयार झाली होती, जर पाय  बाजूला पडला तर खोल बर्फात जाऊन  तोल जायचा.
            ३ कि.मी अंतर  पार करायला ४ तास लागले.पुलाच्या पुढे दोन धाबे होते.तिथे २ ट्रक,४-५ बाईक अडकलेल्या होत्या.आम्ही  रस्त्याने चालत होतो पाठीवर होते छत्रू  उंची १११००ft  लोकसंख्या १२०.थोड पुढ गेल्यावर एक मोठा हॉल होता जिथे शेकोटी केली होती.तिथे काही वेळ आम्ही सर्व थांबलो.अंगातले कपडे ओले झाले होते,सर्व शरीर गारठले होते.पाया बद्दल बोलायला नको.शेकोटी जवळ बसल्यावर जरा बर वाटल.
           थोड्या वेळाने परत चालू लागलो व एक स्टोअर रूम मध्ये आलो.खाली ताडपत्री टाकली होती,सिमेंटच्या विटा एका बाजूला रचल्या होत्या,बांधकामाचे गज लावले होते साईडला.गोडाऊन होते ते पण त्यांनी तात्पुरते दिले ठीक करून आम्हाला.अशा पक्क्या घरात सगळ्यांनी आपले समान ठेवले.अंगावरचे ओले कपडे बदलले.
         सकाळचे ११:३०- १२  वाजले होते,जेवण मिळणार नव्हते.मनात गणपती बाप्पाचे आभार मानले  चला  आपण सुरक्षित जागी आलो.इथे टेंट हलवणे, बर्फ काढणे अस काही कराव लागणार नव्हत.दुपारी गरम चहा मिळाला.या रूम मध्ये २५ ट्रेकर्स त्यात दोन मुली आणि २ गाईड राहणार होतो.संध्याकाळी ५:३० वा  रात्रीच्या जेवणात राजमाचे वरण, भात आणि रोटी होती. जेवण कस होत ? नंतर सांगतो.
         आमच्या रूम वरून  जेवणासाठी व  सू शी साठी जायचं  म्हटल तर छोटा ट्रेक करावा लागायचा.शूज घालायचे,पोन्चो घालायचा,तिथे  जायचं,परत आल्यावर अर्धा तास पाय हाताने घासायचे गर्मी येण्यासाठी.
आजचा सुरक्षित जागेचा पत्ता  मुक्काम पोस्ट - छत्रू, तालुका- बाहल, जिल्हा -मंडी ,हिमाचल प्रदेश  पहिला दिवस (रविवार २३/सप्टेंबर/२०१८ ,अनंत चतुर्दशी).       
         रात्री ८:३० वाजता सगळे झोपी गेले.आजचा दिवस आव्हानत्मक होता.आपल्याकडे जस संततधार पाऊस पडतो तसच इथे कालपासून  बर्फवृष्टी चालू होती.

Comments

Popular posts from this blog

हम्पटा पास ट्रेक :दिवस तिसरा ( चिक्का ते बालू का घेरा)

हम्पटा पास ट्रेक : अविस्मरणीय छत्रूतून सुटका

हम्पटा पास : पहिला हिमालयीन ट्रेक