हम्पटा पास ट्रेक:सुरुवात
आज सोमवार पहाटे ५:३० वाजता जाग आली. थंडी प्रचंड होती.चहा घेतल्यावर आमचा ट्रेक लीडर रनिंगसाठी घेवून गेला.२० मिनिट रनिंग केल्यावर वाटेतल्या एका शाळेच्या मैदानावर व्यायामासाठी थांबलो.सर्वानी गोल करून व्यायाम केला.शेवटी ट्रेक लीडरने सर्वाना डोळे बंद करून शांतपणे आयुष्यातील सकारात्मक व नकारात्मक गोष्टींचा विचार करा आणि नकारात्मक विचार/गोष्टी हिमालयातील पर्वतांना देणे व सकारात्मक उर्जा /विचार पर्वताकडून घेणे.मला हा विचार खूप आवडला.
बेस कॅम्प वर परत आलो.नाश्ता केल्यावर सॅॅकमध्ये थोडे समान घेवून Acclimatization walk साठी सर्व निघालो.
आज साजा नावाचा सण असल्यामुळे शाळेला सुट्टी होती लहान मुले नातेवाईकांच्या घरी झेंडूच्या झाडाची पाने घेवन जातात व आशीर्वाद घेतात मोठ्यांचा जेवण करतात.वाटेत आम्हाला एक मंदिर लागले तिथे झेंडूची पाने मंदिरात देवासमोर दिसली.मला आपल्याकडील दसरयाची आठवण झाली

मंदिराच्या बाजूला एक ४५ वर्ष जुने लाकडी घर होते तिथे ६५ वयाच्या आजी दिसल्या त्यांना विचारून मी व आणखी एक जण त्यांच्या घरी गेलो घर बघितले,व त्यांच्याशी गप्पा मारल्या.आजीच्या सूनबाईने एकीला पतलू (Traditional dress) घालून दिला.
पुढे सफरचंदाची बाग लागली.आजूबाजूला घरे होती.
दाट देवधारची झाडे असलेल्या ठिकाणी सर्वानी सरबत घेतले व परत फिरलो,परत जतन उतार होता.Hatchery बघण्यासाठी काही वेळ दिला नंतर बेस कॅम्पवर पोहोचलो तेव्हा जेवनाची वेळ झाली होती.जेवण झाल्यावर शेवटची अंघोळ केली कारण पुढे आठवडाभर अंघोळ शक्य नव्हती
दुपारी ट्रेकिंगचे नियम,मार्ग ,मुकामाच्या जागा, स्वच्छता,थंडीत काय काळजी घ्यावी याबद्दल ट्रेक लीडरने माहिती दिली
रात्री Camp fire without fire ,Introduction व Certificate Distribution झाले.

Comments
Post a Comment