हम्पटा पास ट्रेक:दिवस पहिला

   


आज बुधवार प्रत्यक्ष ट्रेकला  सुरुवात झाली.सकाळी उठून चहा,नाष्टा झाला.सोबत Pack lunch घेतले.
               साधारण ८:०० वाजता सर्वांची Counting होवून,Field Director यांनी झेंडा दाखवून,कॅम्प लीडर,किचन स्टाफ, ट्रेक लीडर यांनी  सर्व ट्रेकर्सला  शुभेच्छा दिल्या.आधीचे व नंतरचे ट्रेकर्स लाईन मध्ये उभे राहून चीअर करत होते.शिवाजी महाराजांचे मावळे एखाद्या मोहिमेला निघताना जसे वातावरण असेल कदाचित तसेच वातावरण मी अनुभवत होतो (काही वेळासाठी)
                १५ कि मी प्रवास बसने मनाली मार्गे पुढे प्रिणी गावा पर्यंत केला.ट्रेक लीडर मोनू आणि पन्ना भाई आमच्यासोबत  आले.बेसिक टिप्स त्यांनी सांगितल्या
-कितना बाकी है?अस कुणीही विचारायचं नाही
-सगळे आता Family सारखे आहेत.कृपया एकमेकांना सांगा काहीही प्रोब्लेम वाटला तर(Altitude Sickness)
-अतिशय महत्वाचे ५० % मेंदुचा रोल ट्रेक पूर्ण करण्यात तेव्हा Concentrate on single STEP.
    आजचा ट्रेक ८ कि मी आहे.मनाली हे शहर समुद्र सपाटीपासून ६२९८ फुटावर आहे.रात्रीचा मुक्काम सेठान  (उंची ९१८४ फुट) या गावी आहे 
ट्रेक सुरु झाला तो डांबरी रस्ता होता,कार त्या रस्त्याने सेठानला जात होत्या.डोंगरावर जसा घाट असतो तसाच.साधारण ४० Curves (Hair pin bend) घाट  होता .आम्ही रस्त्याने न जाता पायवाटेने वर  चढत होतो.
पहिला दिवस  असल्यामुळे छोटे ब्रेक्स घेत, आजूबाजूचा परिसर बघत निवांतपणे सगळेजण चालत होते

वाटेत एक शाळा लागली शाळेतल्या मुलांबरोबर गप्पा मारल्या फोटो काढले 
 

  आजूबाजूला धौलाधार पर्वत रांगा आहेत व बियास नदी संथ वहाते.देवधार झाडांची दाट जंगल आहेत.
दुपारी एक वाजता सर्व जेवणासाठी एका हॉटेलवर थांबले.लंंचसाठी डब्ब्यात भेंडी आणि रोटी होती.अशा  ठिकाणी जेवणाची मजा  काही औरच.
चालून शरीर थकले होते जेवण झाल्यावर हिरव्या गवतावर चक्क डुलकी घेतली मी तेही उन्हात.
पुढे  चालायला सुरुवात केली आणि मुक्कामाच्या ठिकाणी सेठान ला पोहोचलो.गावात प्रवेश केला तेव्हा एका आजीबाई लाकड आणायला चालली होती तिने स्वागत केले आमचे.तिच्या घरी आम्ही थांबणार होतो.
एक  गुजराती कपल होत आमच्याबरोबर त्यांच्याशी  ती गुजराथी लोक खूप चांगले असतात  अस बोलली आणि दिल्लीवाले खतरनाक असतात  तीच मत.महाराष्ट्रातले आम्ही ४-६ जण होतो कुणी हिम्मत नाही केली तिला विचारायची महाराष्ट्रातले लोक कसे असतात ?
सेठान हे साधारण २० घरांचे गाव आहे.ज्यांना मनालीची गर्दी नकोय असे काही पर्यटक तिथे येतात.(Hidden gem of Manali)
इथून पुढे पांडूरुपा नावाची जागा आहे जिथे पांडवांनी (महाभारताच्या आधी)वास्तव्य करून  शेती केली ,ध्यान केले.अशी Spiritual जागा आहे.अंधार पडायच्या आत आम्ही ४ -५ जण  आलो त्या दिशेने चालत गेलो.  मनाली,बियास नदी आजूबाजूची पर्वत रांगा सुरेख दिसत होत्या.



रात्री पारा  ७ पर्यंत खाली आला.आज पक्क्या घरात मुक्काम होता.आज  लाईट व नेटवर्कचा शेवटचा दिवस  होता .उद्यापासून सर्व बंद व पुढील ५ दिवस तुमचा जगाशी संपर्क तुटणार होता.क्रमश

Comments

Popular posts from this blog

हम्पटा पास ट्रेक :दिवस तिसरा ( चिक्का ते बालू का घेरा)

हम्पटा पास ट्रेक : अविस्मरणीय छत्रूतून सुटका

हम्पटा पास : पहिला हिमालयीन ट्रेक