हम्पटा पास ट्रेक :मुक्काम पोस्ट छत्रू (भाग २ )
सोमवार २४/०९/२०१८ दुसरा दिवस छत्रू
काल रात्री शांत झोप लागली.शनिवारी ट्रेक करून दमलो होतो,रविवारी बर्फाचा विचार करून थकलो होतो आणि आज अशी माहिती होती की बर्फ थांबणार नाही पुढील काही दिवस.चहा आला ७:०० वाजता. चहा घेतल्यावर पत्ते खेळायला घेतले ७:३० वाजता आणि BLUFF चा डाव जेवणापर्यंत चालू होता.टेलीफोनला रेंज नाही,लाईट नाही मनात विचार आला कुठे फसलो आपण ?कधी सुटका होईल ?देव जाणे?
सकाळी १० वाजता जेवण केल.दुपारी १२ वाजता आमच्या नंतरचा ग्रूप HPR 10 कठीण परिस्थितीत ट्रेक करून आज छत्रूला आमच्या सोबत राहायला आला.आता रूम मध्ये एकूण ४२ जण राहणार होते.त्यांनी कसा ट्रेक केला सियागोरू ते छत्रू याची माहिती दिली.दुपारी ४ वाजता चहा आला.चहा घेतल्यावर परत पत्ते चालू.
दुपारी फोन लागला कुल्लू बेस कॅम्पला आणि ग्रूप लीडरने माहिती दिली की दोन्ही ग्रूप इथे सुखरूप आहे.संध्याकाळी ५:३० वाजता रात्रीच जेवण केल.रात्री लवकरच झोपी गेलो.आपल्याकडे जस संततधार पाऊस पडतो तसा इथे बर्फ पडत होता,बर्फ थांबायचे काही चिन्ह नव्हते.
आम्ही सगळे जिथे छत्रूला थांबलो होतो ते काय आपल्याकडे जस गाव असत तस नव्हत.ती एक खाजगी प्रॉपर्टी होती.गावातले लोक इथे काम करत,त्यांचे स्वतःचे घर नव्हते. काही बायका,पुरुष मोठे मुल अशी ३०-४० जण होते,त्यांच्या बरोबर आमचा स्वयपाक ते बनवायचे.जो सगळ्यांवर देखरेख ठेवायचा तो मुख्य Caretaker क्षितीज भाई ,त्याने सांगितले की इथे सकाळी ७ वाजता चहा,१० वाजता जेवण (वरण भात),दुपारी चहा ४ वाजता ,संध्याकाळी ५:३० जेवण (वरण,भात, रोटी) अस असेल.चहा रुमवर मिळेल.जेवायला वेळेत या कारण अंधार लवकर पडतो इथे.रात्री ८ ते १० जनरेटर ची लाईट असेल.आजचा दिवस सेटल होण्यात गेला.
मंगळवार २५/०९/२०१८ तिसरा दिवस छत्रू
आजचा दिवस काल सारखाच होता.दिवसभर एकाच रूममध्ये.आज सकाळी फोटो काढले.बर्फ ३ते ४ फुट साचला होता,सगळीकडे बर्फ आणि बर्फ दिसत होता.इथे जेवायला आणि सू शी ला जाण्यासठी छोटा ट्रेक करावा लागायचा.शूज घाला,पोन्चो घाला ,परत आल्यावर हाताने पाय घासा गर्मी येण्यासाठी
आनंदाची गोष्ठ आज अशी की घरी फोन झाला.तिथे STD BOOTH होत.YHA ने इमर्जन्सी नंबर वर फोन केला होता.बातमी अशी होती की खाली कुल्लू मनाली येथे मुसळधार पाऊस चालू आहे,LAND SLIDE झाल्या.सगळ्यांच्या घरचे काळजीत होते.
बर्फवृष्टी कमी झाली होती पाऊस चालू होता.खर सांगायचं तर मला काही समजत नव्हत बर्फवृष्टीच कमी का जास्त?एकमेकांना हिम्मत देण्यासाठी होत हे सगळ.
रात्री जेवण झाल्यावर गरम पाणी पिण्यासाठी मिळायचं.रात्री पारा -५ ते -६ पर्यंत आला अस समजल.दिवसभर एकाच खोलीत आयुष्य जगण किती अवघड?बाहेर फक्त जेवण व सुसाठी. पत्ते, गाण्याच्या भेंड्या,दमशराज आणि लुडो किती खेळणार? कालपासून रात्री गोष्टी सांगण चालू झाल,सगळे शांतपणे ऐंकायचे. आजचा दिवस काळजीत गेला.
बुधवार २६/०९/२०१८ चौथा दिवस छत्रू
आज सकाळी जाग आली नेहमी प्रमाने.बाहेर बघतो तर काय आश्चर्य आकाश एकदम मोकळ होत,ऊन पडल थोड्या वेळाने.आता लगेच चर्चा चालू झाली BRO रस्ता साफ करेल आणि आपली बस जी रोहतांगला अडकली आहे ती येईल उद्या आणि आपण इथून बाहेर पडू.कुणालाच बर्फवृष्टीत फसल्याचा काही अनुभव नव्हता पण थोड्या वेळासाठी मलाही आशा वाटायची आणि प्रश्न पडायचा खरच शक्य आहे का हे ?
आता रोज वरण भात खाऊन बोर झाल आहे अस कुणी सांगितल आणि मग रात्री अंडाकरीचा बेत होता जेवायला,शाकाहारी लोकांसाठी फुलकोभी,ज्याची शेती होती तिथे आणि बर्फाखाली होता फ्लावर.
इथे आल्यापासून कपडे,बूट ,मोजे सगळ ओल होत ते बाहेर उन्हात वाळू घातलं.सर्व जण उन्हात बाहेर फिरत होते.सगळ लक्ष आकाशात होत,कारण आता वातावरण बदलायला नको.उन पडल तर इथून सुटका होणार होती.आजचा दिवस आशादायक होता.
गुरुवार २७/०९/२०१८ पाचवा दिवस छत्रू
आज आशा होती संध्याकाळी बस येईल,पण तस काही झाल नाही.सकाळी १०:३० वाजता जेवण झाल आणि मी,गौतम, रितेश आणि अनिश खाली म्हणजे जिथे धाबे लागले होते तिथे गेलो.जायला १ तास लागला .उन पडल्यामुळे तिथले लोक रस्त्यावरचा बर्फ साफ करताना दिसत होते वाटेत.
पुलावर साठलेला बर्फ वितळत होता. तिथे काही बायकर्स फसलेले होते,त्यांच्याशी बोललो.त्यांनी सांगितल ग्राम्फू पर्यंत रस्ता साफ झाला आहे,आणि ग्राम्फू इथून १३ की.मी आहे.नंतर छत्रू कॅम्प साईट लांबून बघितली तिथे फक्त किचन टेंट उभा दिसला,बाकी टेंट पडले होते,जिथे आम्ही रात्र काढली होती.
आम्ही चौघे धाब्यावर गेलो कॉफी घेतली आणि गप्पा मारत बसलो. आज वेळ कसा गेला ते कळलपण नाही.जाताने आम्ही चोघांनी असा प्लान केला की आपण सगळे ट्रेक करत ग्राम्फू पर्यंत जाऊ उद्या आणि तिथून पुढे आर्मीची मदत घेऊ.बस येण्याची आता काहीच शक्यता नव्हती.
रुमवर गेल्यावर समजल की गाईड ने असाच प्लान सांगितला आहे आणि उद्या सगळे पहाटे निघतील.
संध्याकाळी ४:३० वाजता चहा पीत असताना चाॅपरचा आवाज आला आणि सगळे बाहेर आले तर काय आश्चर्य ते चाॅपर आमच्यासाठीच आले होते,थोड्यावेळाने दुसर चाॅॅपर ही आल आणि ४ जणांना घेऊन गेले.फोन आल्यावर अस समजल की Indian Air Force ने OPERATION WHITE MOUNTAIN च्या मोहिमेत या भागात अडकलेल्या सगळ्या लोकांची सुटका करत आहे.आमचा जीव भांड्यात पडला.
संध्याकाळी ६ वाजता जेवण झाल आणि फोन आला की उद्या सकाळी चाॅपर येणार आणि सगळे Rescue होणार.आनंद गगनात मावेना या लहानपणी शिकलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ आज मला समजला.केयर टेकर क्षितीज भाईने सगळ्यांसाठी बोनफायर Party करायला सांगितली.जिथे आम्ही जेवायचो त्या हाॅलमध्ये Music system DEK लावून दिला.तिथल्या पुरुष ,बायका,मुलांसोबत सगळे ट्रेकर्सनी कुलबी गाण्यावर मनसोक्त पारंपारिक डान्स केला.रात्री ११ पर्यंत Celebration चालू होत.कारण आज शेवटची रात्र होती छत्रू या गावी.आजचा दिवस आनंदायी होता.क्रमश








Comments
Post a Comment