हम्पटा पास ट्रेक:सुरुवात
आज सोमवार पहाटे ५:३० वाजता जाग आली. थंडी प्रचंड होती.चहा घेतल्यावर आमचा ट्रेक लीडर रनिंगसाठी घेवून गेला.२० मिनिट रनिंग केल्यावर वाटेतल्या एका शाळेच्या मैदानावर व्यायामासाठी थांबलो.सर्वानी गोल करून व्यायाम केला.शेवटी ट्रेक लीडरने सर्वाना डोळे बंद करून शांतपणे आयुष्यातील सकारात्मक व नकारात्मक गोष्टींचा विचार करा आणि नकारात्मक विचार/गोष्टी हिमालयातील पर्वतांना देणे व सकारात्मक उर्जा /विचार पर्वताकडून घेणे.मला हा विचार खूप आवडला. बेस कॅम्प वर परत आलो.नाश्ता केल्यावर सॅॅकमध्ये थोडे समान घेवून Acclimatization walk साठी सर्व निघालो. आज साजा नावाचा सण असल्यामुळे शाळेला सुट्टी होती लहान मुले नातेवाईकांच्या घरी झेंडूच्या झाडाची पाने घेवन जातात व आशीर्वाद घेतात मोठ्यांचा जेवण करतात.वाटेत आम्हाला एक मंदिर लागले तिथे झेंडूची पाने मंदिरात देवासमोर दिसली.मला आपल्याकडील दसरयाची आठवण झाली मं...